Top 5 This Week

Related Posts

जिल्हा परिषद उर्दू शाळा, बेलसवाडी येथे ‘भविष्यातील नागरिक’ निवडणूक उपक्रम उत्साहात संपन्न

मुक्ताईनगर : जिल्हा परिषद उर्दू शाळा, बेलसवाडी (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) येथे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचे प्रत्यक्ष व व्यवहार्य ज्ञान मिळावे या उद्देशाने ‘भविष्यातील नागरिक’ (निवडणूक) हा अभिनव शैक्षणिक उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला.

Screenshot 2026 01 07 23 12 12 18 7352322957d4404136654ef4adb64504

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेतील सर्व टप्प्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. उमेदवार निवड, प्रचार प्रक्रिया, मतदार यादी तयार करणे, मतदानाची पद्धत तसेच मतमोजणी या सर्व बाबी प्रात्यक्षिक स्वरूपात विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या. मतदानाचा अधिकार काय आहे, तो कसा वापरावा आणि निवडणूक प्रक्रियेचे लोकशाहीत असलेले महत्त्व याची सखोल जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव वाढीस लागली असून भविष्यात जबाबदार, सजग व कर्तव्यदक्ष नागरिक घडण्याची प्रेरणा मिळाली आहे. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग व उत्साह विशेष उल्लेखनीय ठरला.

उपक्रमाची प्रभावी मांडणी व यशस्वी अंमलबजावणी पाहून गावाच्या प्रथम नागरिक मंदाकिनी कोळी मॅडम (सरपंच, बेलसवाडी), ग्रामपंचायत सदस्य फरीद खान व मनीष पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख अकिल व सर्व सदस्य, उर्दू केंद्र प्रमुख अनिस खान, अब्बास खान तसेच पालकांनी शाळेचे मुख्याध्यापक शेख नाजीम शेख अब्दुल्लाह, उपशिक्षक सय्यद जुनेद सय्यद मुसा व उपशिक्षक सज्जाद अहमद शेख अहमद यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व लोकशाही मूल्य रुजविण्यास अत्यंत उपयुक्त असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

Atiq Bilal Khan
Atiq Bilal Khanhttps://viralnewslive.in/
Atiq Bilal Khan is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Name: Atiq Bilal Khan Designation: Khandesh Divisional Editor Location: Seed Farm, Muktainagar, District Jalgaon (Khandesh) Phone: 9325146187

Popular Articles