जयपूर (राजस्थान) येथील पूर्णिमा विद्यापीठ येथे केंद्रीय युवक व क्रीडा व्यवहार राज्य मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत “खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025” च्या समारोप समारंभात संपन्न झाला. देशभरातून आलेल्या खेळाडूंना संबोधित करून तसेच प्रतिभावान खेळाड्यांचा गौरव करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी *राजस्थान सरकारचे उपमुख्यमंत्री श्री. प्रेम चंद बैरवा जी व युवक व क्रीडा व्यवहार मंत्री श्री. राजवर्धन सिंह राठोड जी उपस्थित होते.
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025” चे आयोजन 5 डिसेंबरपासून राज्यातील 7 शहरांमध्ये पार पडले असून विविध प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये देशभरातील 5 हजारांहून अधिक युवा खेळाडूंनी आपली प्रतिभा आणि उत्कृष्ट कामगिरी सादर केली.
केंद्रीय युवक व क्रीडा व्यवहार राज्य मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी “खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स” ला विविध राज्यांच्या खेळाडूंच्या सांस्कृतिक आदानप्रदानाचे आणि उत्कृष्टतेकडे घेऊन जाणाऱ्या मार्गाचे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, “जिंकणं-हरणं वेगळी बाब आहे, पण प्रत्येक राज्य आणि प्रदेशातील खेळाडू इथे सहभागी झाले आहेत, हीच खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स ची सर्वात महत्त्वाची बाब आहे. आपण जिथेही जातो, तिथल्या राज्याची संस्कृती समजून घेतो, भाषा शिकतो आणि खेळाला नवीन ऊर्जेसह पुढे नेत असतो.”
आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि केंद्रीय युवक व क्रीडा व्यवहार मंत्री श्री. मनसुख मांडविया जी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार व क्रीडा मंत्रालय देशातील खेळाडूंना उत्तम संधी आणि सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 देशभरातील क्रीडा प्रतिभांना आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी एक उत्कृष्ट मंच प्रदान करीत आहे.





