छत्रपती शिवरायांचे कार्य आजही प्रेरणादायी —– तहसीलदार गिरीश वखारे

0
4
छत्रपती शिवरायांचे कार्य आजही प्रेरणादायी ----- तहसीलदार गिरीश वखारे
छत्रपती शिवरायांचे कार्य आजही प्रेरणादायी ----- तहसीलदार गिरीश वखारे
Advertisement

मुक्ताईनगर प्रतिनिधी…….
योगमाया प्रतिष्ठान, मुक्ताईनगर ह्या सामाजिक संस्थेच्या वतीने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निम्मित आयोजित भव्य निबंध लेखन स्पर्धेचा संत मुक्ताबाई महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.

पारितोषिक वितरण समारंभासाठी तहसीलदार गिरीश वखारे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
राज्य गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
योगमाया प्रतिष्ठान, मुक्ताईनगर चे संस्थापक अध्यक्ष श्री.अश्विन सुरवाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले शिव विचारांचा करूया जागर या ब्रीद वाक्याला घेऊन वैचारिक शिवजयंती साजरी करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी सांगितल .
तर काही निवडक विद्यार्थी, विद्यार्थिनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रमुख अतिथी तहसीलदार गिरीश वखारे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, विचार, संघर्ष या विषयी माहिती विषद केली व छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन
आपल्यासाठी आजही प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन केले.

Advertisement

पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी गटनिहाय 35 विजेत्यांना तहसीलदार वखारे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले.
व्यासपीठावर प्राचार्य डॉ.आय डी पाटील,प्रा. शेवाळे आदी उपस्थित होते.

निकाल पुढील प्रमाणे –
जिल्हा परिषद शाळा गट –
परी प्रमोद पाटील – प्रथम क्रमांक
देवयानी मुकुंदा लोहार -द्वितीय क्रमांक
पायल विनोद जाधव -तृतीय क्रमांक
रोहित पंडित मोरे -उत्तेजनार्थ
योगिता महेंद्र सोनवणे -उत्तेजनार्थ
प्राची संदीप विटकरे -उत्तेजनार्थ

ग्रामीण शालेय गट पाचवी ते आठवी
कार्तिक कोळी -प्रथम क्रमांक
प्रणाली घोगरे -द्वितीय क्रमांक
केतकी कोळी – तृतीय क्रमांक

ग्रामीण शालेय गट नववी ते बारावी
प्रियंका जाधव -प्रथम क्रमांक
पूर्वजा गवळी -द्वितीय क्रमांक
सृष्टी गायकवाड -तृतीय क्रमांक

शहरी शालेय गट पाचवी ते सातवी
समर्थ धनगर -प्रथम क्रमांक
इशिता महाजन – द्वितीय क्रमांक
श्रुती वाघ -तृतीय क्रमांक

शहरी शालेय गट सातवी व आठवी
दिव्यांशी पाटील -प्रथम क्रमांक
स्वाती गावंडे – द्वितीय क्रमांक
आदित्य कोळी -तृतीय क्रमांक
भक्ती शेळके -उत्तेजनार्थ
एकता पाटील -उत्तेजनार्थ

शहरी शालेय गट नववी ते बारावी
शर्वरी केतन पाटील -प्रथम क्रमांक
रुद्र वरणकार -द्वितीय क्रमांक
सारिका बेलदार -तृतीय क्रमांक
प्रसनजीत साबळे -उत्तेजनार्थ
तनुजा चव्हाण – उत्तेजनार्थ
पल्लवी पावरा -उत्तेजनार्थ
गायत्री पाचपोळ – उत्तेजनार्थ

वरिष्ठ महाविद्यालय गट UG ते PG
सानिका सोनार -प्रथम क्रमांक
मानस वळवी -द्वितीय क्रमांक
शुभांगी सावळे -तृतीय क्रमांक
पुनम बारी -उत्तेजनार्थ
माया पालवे -उत्तेजनार्थ
संकेत घुनावत -उत्तेजनार्थ
दीक्षा तळेले – उत्तेजनार्थ
ममता मोरे – उत्तेजनार्थ

यांना पारितोषिक प्राप्त झाले.

तर स्पर्धेत एकूण 405 विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता त्या सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
श्री प्रवीण राठोड यांनी आभार व्यक्त केले.
वंदे मातरम् ने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

पारितोषिक वितरण यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी योगमाया प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विन सुरवाडे,संकेत कपले,मयूर पाटील,सनत जैन,प्रवीण राठोड,मनीष महाजन,तेजस सापधरे,वैभव इंगळे,रूपेश कोळी,विश्वजित देशमुख, अनिल गवते आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here