Top 5 This Week

Related Posts

चार महिने उलटून विवरा अतिवृष्टीग्रस्तांना नुकसानभरपाई न मिळाल्याने ग्रामस्थ संतप्त;

तिन दिवसांत नुकसानभरपाई न दिल्यास तहसील कार्यालयात “पाल ठोकून झिंगे-बोबींल भुजो” आंदोलनाचा शिवसेना (उबाठा) चा उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांना निवेदनाद्वारे इशारा

चार महिने उलटून विवरा अतिवृष्टीग्रस्तांना नुकसानभरपाई न मिळाल्याने ग्रामस्थ संतप्त;
चार महिने उलटून विवरा अतिवृष्टीग्रस्तांना नुकसानभरपाई न मिळाल्याने ग्रामस्थ संतप्त;

मलकापुर:- तालुक्यातील ग्राम विवरा येथे 4 महिन्यापूर्वी दि.16 सप्टेंबर 25 रोजी ढगफुटी होऊन अतिवृष्टी झाली.या अतीवृष्टीने शेतातील उभी पिके वाहून शेतजमीनी खरडून गेल्या, रहिवासी ग्रामस्थांचे घरांत पाणी गेल्याने अन्नधान्यासह जिवनावश्यक साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करण्याकरीता पालकमंत्री ना.संजय सावकारे, मलकापूर मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती, उपविभागीय महसूल अधिकारी संतोष शिंदे, तत्कालीन तहसीलदार राहुल तायडे,तलाठी, मंडळ अधिकारी आदींनी भेटी दिल्या. नुकसानग्रस्त शेती,घरांची पाहणी करून पंचनामे करण्यात आले. पंचनामे होऊन तब्बल चार महिने उलटले मात्र शासनाने अनुदान अद्यापही ग्रामस्थांच्या खात्यात जमा केले नाही. ग्रामस्थांची खाते विदर्भ ग्रामीण कोकण बँकेत असताना तुमचे पैसे पोस्टात जमा होतील म्हणून शेतकरी, ग्रामस्थांनी पोस्टात खाते काढायला लावले तरीही नुकसानभरपाई मिळाली नाही..आता तुमचे पैसे स्टेट बँकेत जमा झाले असून ते तिथून संबंधितांना वितरित केल्या जातील असे फरमान गवई यांनी सोडले असून चार महिने उलटून सुद्धा अद्यापही अनुदान खात्यावर जमा झाले नाही,गवई हे शेतकरी व ग्रामस्थांशी सौजन्य पणे वागत नसून अरेरावीची भाषा बोलत आहे, शेतकरी ग्रामस्थ तहसिल कार्यालयात चकरा मारून थकल्याने व चपला घासू लागल्याने त्यांनी याबाबतची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शहर प्रमुख हरीदास गणबास यांना सांगितल्याने आज दि.15 डिसेंबर 25 रोजी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांना निवेदन देऊन तीन दिवसात विवरा येथील अतिवृष्टी धारकांच्या खात्यात जमा करा अन्यथा शुक्रवार दि.19 डिसेंबर 25 रोजी तहसील कार्यालय आवारात “पाल ठोकून झिंगा बोंबील भुजो आंदोलन” करण्याचा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी दिला आहे. निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शहरप्रमुख हरिदास गणबास, युवा सेना शहरप्रमुख मंगेश सातव, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, सिताराम तायडे, दामा तायडे, समाधान तायडे, संघपाल तायडे, विलास तायडे,रघुनाथ सोनोने, सुखदेव वाळसे, मुरलीधर हिरळकर, त्र्यंबक तायडे, रविकर तायडे,भागवत कडू, अरुण सोनोने,आनंदा तायडे, दीपक तायडे, समाधान सोनोने,योगेश भिल, जंगलू सोनवणे,शे.शब्बीर शे.बुढन,सै.रहीम सै.करीम,सै.फरहान सै.यासीन,सै.तौफीक सै.रफीक सह विवरा ग्रामस्थ व शिवसैनिकांची उपस्थिती होती.

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Popular Articles