खडसे महाविद्यालयात पीएम-उषा अंतर्गत भूगोल विभागात प्रमाणपत्र अभ्यासक्रम संपन्न

Advertisement

मुक्ताईनगर प्रतिनिधी… . येथील खडसे महाविद्यालयात पीएम-उषा अंतर्गत भूगोल विभागात Land Measurement by using GPS हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम संपन्न झाला. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयातील 30 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला होता. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या लेखी व प्रात्यक्षिक तासिकेत प्रा. चतुर पी.गाढे (भूगोल विभाग प्रमुख, व्ही.एस. नाईक महाविद्यालय, रावेर) यांनी व्याख्यान व प्रात्यक्षिकद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. एस. एन. पाटील (भूगोल विभाग प्रमुख) यांनी कार्य केले.
New techniques in Geo-spatial म्हणजेच आधुनिक सर्वेक्षण पद्धती तसेच जीआयएस, जीपीएस व रिमोट सेन्सिंग याबाबतची सविस्तर माहिती दिली. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थी रोजगार निर्मिती होईल अशी आशा महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन यांनी व्यक्त केली. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. संजीव साळवे व प्रा. डॉ. वंदना चौधरी यांनी या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे संयोजन केले. तसेच पीएम-उषाचे समन्वयक डॉ. अनिल पाटील यांनी प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी मौलिक सूचना केल्या. त्याचबरोबर पीएम-उषाचे सहसमन्वयक प्रा. डॉ. अतुल वाकोडे यांनी प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी सहकार्य केले. याचबरोबर भूगोल विभागातील प्रा. विजय डांगे, प्रा. राजन खेडकर व प्रा. डॉ. अतुल बढे यांनी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे नियोजन केले.

Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here