खडसे परिवाराचा घटक म्हणून नगरपंचायत निवडणूक रिंगणात उतरणार… आमदार एकनाथराव खडसे.

img 20251128 wa0007
img 20251128 wa0007
Advertisement

संदीप जोगी… मुक्ताईनगर….

मुक्ताईनगर नगरपंचायतीची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू असून गेल्या तीन-चार दिवसांपासून केंद्रीय युवक क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे व विधानसभेचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप चालू आहेत. आमदार पाटील यांनी ही निवडणूक खडसे परिवारासोबत असल्याचे म्हटले आहे. या वृत्ताचा समाचार घेत माजी मंत्री विधानपरिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी 28 नोव्हेंबर रोजी खडसे फार्म हाऊस वर पत्रकार परिषद घेत आमदार चंद्रकांत पाटील यांना थेट प्रश्न विचारले असून त्याचे उत्तर त्यांनी द्यावे असे आव्हानच त्यांनी केलेले आहे.
मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये एकही उमेदवार दिलेला नाही. आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक ही खडसे परिवाराच्या सोबत असल्याचे म्हटले होते. म्हणून खडसे परिवाराचा घटक म्हणून मी आता प्रत्यक्ष निवडणूक रिंगणामध्ये उतरणार आहे.
कालच मुक्ताईनगर येथे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची प्रचार सभा संपन्न झाली यामध्ये त्यांनी आमदारांना मी किती रुपये विकास कामांसाठी दिले असे विचारले असता आमदार पाटील यांनी 5000 कोटी रुपये दिल्याचे सांगितले. यामध्ये एमआयडीसीला मिळालेले 500 कोटी हे कुठे गेले, आदिशक्ती श्री संत मुक्ताई मंदिराच्या मूळ बांधकामासाठी एक रुपयाही आमदारांनी दिला नाही, अल्पसंख्यांक पॉलिटेक्निक कॉलेज गेल्या तीन वर्षापासून का सुरू झाले नाही, मुक्ताईनगर येथील पाणीपुरवठ्याची योजना मी असताना मंजूर केली होती त्याला स्टे आणून तीच पुन्हा मंजूर करीत आता त्यामध्ये पाच कोटी रुपयांची वाढ झालेली असून हा भूदंड कोणाला, वक्फ बोर्डाला 12 कोटी रुपये दिले ते कुठे आहेत? शहरातील विकास कामांसाठी मी निधी आणला होता त्याला शिंदे सरकार असताना स्टे आमदारांनी आणला होता असे प्रश्न पत्रकार परिषदेमध्ये आमदार एकनाथराव खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना विचारलेले असून त्यांनी त्याचे उत्तरे द्यावे असाही थेट प्रश्न आमदार खडसे यांनी केला.
पत्रकार परिषदेला आमदार खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते, माजी सभापती निवृत्ती पाटील उपस्थित होते.

Advertisement
Subscribe to Viral News Live