Top 5 This Week

Related Posts

कठोरा खुर्द येथे ग्राम सचिवालयाचे लोकार्पण व आयपीएस अधिकाऱ्याचा जाहीर सत्कार

भुसावळ (अतिक खान)
रावेर लोकसभा मतदारसंघातील कठोरा खुर्द (ता. भुसावळ) येथे ग्रामदेवत जोगेश्वरी माता ग्राम सचिवालयाचे लोकार्पण तसेच आयपीएस अधिकारी श्री. कांतीलाल सुभाष पाटील यांचा जाहीर नागरिक सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री, भारत सरकारच्या मा. ना. श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भूषविले. तर महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. श्री संजय सावकारे व ह.भ.प. गुरुवर्य भरत महाराज (श्री क्षेत्र कुंडलपूर वेडोळे संस्थान) हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना मा. ना. श्रीमती रक्षाताई खडसे यांनी ग्राम सचिवालयामुळे ग्रामस्तरावरील प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक व लोकाभिमुख होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन समन्वयाने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी आयपीएस अधिकारी श्री. कांतीलाल सुभाष पाटील यांच्या प्रशासकीय सेवेतून केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा जाहीर नागरिक सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास सौ. रजनी सावकारे, सरपंच सौ. रोहिणी प्रशांत पाटील, उपसरपंच सौ. मनीषा उमाकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले

Atiq Bilal Khan
Atiq Bilal Khanhttps://viralnewslive.in/
Atiq Bilal Khan is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Name: Atiq Bilal Khan Designation: Khandesh Divisional Editor Location: Seed Farm, Muktainagar, District Jalgaon (Khandesh) Phone: 9325146187

Popular Articles