उत्कृष्ट काम केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एस. पी. यांनी केला प्रशस्तीपत्र देऊन सन्मान.

Advertisement

मुक्ताईनगर….. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यांतर्गत दाखल असलेल्या विविध गुन्ह्याच्या तपासामध्ये उत्कृष्ट काम करणारे पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्र देऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सन्मान केला.
१) सबळ पुरावे न्यायालयामध्ये देत 302 च्या गुन्ह्यातील आरोपीला जन्मठेपची शिक्षा मिळाली होती, या कामी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ ,पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, उपनिरीक्षक राहुल बोरकर ,पोलीस नाईक मोतीलाल बोरसे, पोहेका विकास नायसे यांनी काम बघितले होते.
२) तालुक्यामध्ये अवैधरित्या गांजा ची लागवड यामध्ये 34 लाख 68 हजाराचा गांजा जप्त केला होता. प्रकरणी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश पाटील, उपनिरीक्षक नयन पाटील, पोहेकॉ संजय पवार, पोलीस नाईक मोतीलाल बोरसे, पोहेकॉ संदीप धनगर, पोहेकॉ दीपक चौधरी, पोहे कॉ रवींद्र धनगर, पोहे कॉ गजानन जाधव, पोहे कॉ चेतन महाजन , पोहे कॉ गोविंदा सुरवाडे यांनी काम बघितले होते.
३) तीन मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. या कामी पोहे कॉ राजेश चव्हाण व पोहे कॉ महेंद्र सुरवाडे यांनी तपास लावला होता.
४) पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या गुन्ह्यांचे फार्म ची माहिती वेळेवर फीडिंग करून दिल्याप्रकरणी महिला पोलीस शिपाई सुवर्णा पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
५) हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेत गुन्ह्याचे तपास केल्याप्रकरणी पोहे कॉ संतोष खवले, पोहे कॉ प्रदीप देशमुख या सर्व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपस्थित होते.

Subscribe to Viral News Live