उचंदा येथे धम्म मेळावा कार्यक्रमाला एडवोकेट अमन आनंदराज आंबेडकर साहेब यांची उपस्थिती

img 20251123 wa0022
img 20251123 wa0022
Advertisement

संदीप जोगी मुक्ताईनगर…..

उचंदा येथे दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी धम्म मेळावा आयोजित करण्यात आला होता भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत दहा दिवसीय धम्म उपाशीका महिला शिबिर
राबविण्यात आले या कार्यक्रम 12 नोव्हेंबर 2025 तारखेपासून सुरू करण्यात आले होता तर समारोपाचा कार्यक्रम 22 नोव्हेंबर 2025 या रोजी भव्य धम्म मेळावा ठेवून कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे
पंतु एडवोकेट अमन आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांचे गावातून भव्य स्वागत रॅली काढून एक क्विंटल झेंडूच्या फुलांचा वर्षाव करण्यात आला समाजाने एकोप्याने राहावे आणि समाजाने बाबासाहेबांचा आदर्श घेऊन शिकून समाज उपयोगी कार्य करावं असा संदेश दिला सदर कार्यक्रमात श्रामनेर संघास भोजनदान कार्यक्रम संपन्न झाला गावातील व परिसरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांना लोकांना सेवा रत्न पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला तसेच भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे केंद्रीय शिक्षिका सुनीताताई वानखेडे यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात परिसरातील उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
सदर नियोजन उचंदा बौद्ध समाज बांधव यांनी केले होते
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँक मॅनेजर दादासाहेब एन जी शेजोळे होते
उद्घाटक आयु के वाय सुरवाडे भारतीय बौद्ध महासभा पर्यटन विभाग सचिव .
दीप धूप पूजा आयु एल एस तायडे ,. रवींद्र मोरे भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष . प्राध्यापक संजीव साळवे आयु सुनील अडांगळे आयु अडकमोल गुरुजी आयु मुकेश मेढे आयु मोहन मेढे आयु शरद बोदळे व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक बौद्ध पंच मंडळ उचंदे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले
आयु दीपक इंगळे भिमस्टार फाउंडेशन अध्यक्ष . किरण तायडे ग्रामपंचायत सदस्य. महिंद्र इंगळे. रतन तायडे . छबीलदास इंगळे . राहुल इंगळे . धनराज इंगळे . संदीप इंगळे . प्रवीण वाघ . सिद्धार्थ मेघे . सनी इंगळे आयुष शरद इंगळे . व बौद्ध समाज युवक समाज बांधव उपासक उपासिका यांनी कार्यक्रम यशस्वी केला .सूत्रसंचालन प्रशांत तायडे यांनी केले .

Advertisement
Subscribe to Viral News Live