मुक्ताईनगर प्रतिनिधी…. ‘शासनाच्या अमृत 2.0 योजनेअंतर्गत मुक्ताईनगर शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील तहसील कार्यलय परिसरासाठी महत्वपूर्ण असलेल्या पाण्याच्या टाकीचा (म्हणजेचं उर्ध्वस्तंभ जलाशयाचे) बांधकामभूमिपूजन सोहळा मुक्ताईनगर पंचायत समिती समोरील टेकडीवर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दि. 1 मार्च 2026 रोजी रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी माफदा अध्यक्ष विनोद तराळ, शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील, तालुका प्रमुख नवणीत पाटील, उपनगराध्यक्षा देवयानी शिरसाट, पाणीपुरवठा सभापती सविता भलभले, नगरसेवक संतोष कोळी, मस्तान कुरेशी, हासम शहा, प्रशांत टोंगे, नितीन जैन, लुकमान शेख, मुशीर मणियार, युनूस खान, मुकेशचंद्र वानखेडे, मजीद खान, बोदवड नगराध्यक्ष दिनेश माळी नगरसेवक हर्षल बडगुजर यांच्यासह वसंत भलभले, गणेश पाटील, योजनेचे ठेकेदार मोरे, यांच्यासह शिवसेना-युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाहुयात आमदार पाटील बोलताना म्हणाले की,
”मुक्ताईनगरचा विकास हाच माझा ध्यास आहे. ‘अमृत २.०’ च्या माध्यमातून आम्ही शहराच्या कानाकोपऱ्यात शुद्ध पाणी पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहोत. ही पाण्याची टाकी केवळ सिमेंटचे बांधकाम नसून ती मुक्ताईनगरकरांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. येत्या काळात उर्वरित कामेही युद्धपातळीवर पूर्ण केली जातील.”






