आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला यश; आरटीओ चेक पोस्ट बंद करण्याच्या कार्यवाहीला वेग

Advertisement

मुक्ताईनगर प्रतिनिधी……. राज्यातील आरटीओ सीमा तपासणी नाक्यांवर होणारी वाहनधारकांची लूट आणि भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आमदार एकनाथराव खडसे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पत्रव्यवहाराची आणि विधिमंडळात मांडलेल्या औचित्याच्या मुद्द्याची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात या नाक्यांवरील कंत्राट रद्द करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली आहे.
आमदार खडसे यांनी आपल्या पत्राद्वारे या नाक्यांवरील ‘कार्ड सिस्टीम’ आणि कंत्राटदाराकडून होणारी अवैध वसुली पुराव्यासह शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार, शासनाने संबंधित सेवापुरवठादार कंपनीला २७ जून २०२५ रोजी कंत्राट रद्द करण्याची (Termination Notice) नोटीस बजावली आहे. या निर्णयामुळे कंत्राटदाराला द्यावी लागणारी भरपाई आणि कायदेशीर बाबींचा रोडमॅप तयार असून, मंत्रिमंडळाच्या अंतिम मान्यतेनंतर हे नाके कायमचे बंद होतील.
तसेच, नाके बंद करण्याच्या प्रक्रियेत खोडा घालणारे निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या विरोधातही खडसे यांनी पत्राद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार खरमाटे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (ACB) चौकशी करण्याची नस्ती १२ ऑगस्ट २०२५ रोजी गृह विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. आमदार एकनाथराव खडसे यांच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे राज्यातील लाखो वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here