आज उचंदा येथे कानिफनाथ महाराजांचा यात्रा उत्सव… भक्तांची दर्शनासाठी होणारी मोठी गर्दी…

0
1
आज उचंदा येथे कानिफनाथ महाराजांचा यात्रा उत्सव... भक्तांची दर्शनासाठी होणारी मोठी गर्दी...
Advertisement

मुक्ताईनगर प्रतिनिधी……

मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे नाथ सांप्रदायातील आराध्य दैवत असलेल्या कानिफनाथ महाराजांचा यात्रोत्सव ११ मार्च रोजी होत आहे. शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम असलेल्या कानिफनायांची यात्रा ही होळी झाल्यानंतर फाल्गुन शुद्ध नवमीला हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत फार मोठ्या उत्साहात भरते. यासाठी उचंदा गावात नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असते.

Advertisement

यात्रेनिमित्त श्री कानिफनाथ महाराजांच्या मंदिरावर रंगरंगोटी, लाईटींग, फुले आदी सजावटींचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सालाबादाप्रमाणे यंदाही श्री कानिफनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त मुक्ताईनगर तालुक्यासह विदर्भ, खान्देश, मध्यप्रदेशातील भाविक मोठ्या संख्येने येतात. यानिमित्त खेळणी, मिठाई, खाद्यपदार्थ हॉटेल आदी दुकाने थाटली जात आहे. मुक्ताईनगर – बहाणपूर राज्य मार्गावरुन पुरनाड फाट्यापासुन २ कि. मी. अंतरावर उचंदा गाव असुन श्री कानिफनाथ महाराजांची पाषाणाची मुर्ती असलेले भव्य मंदिर आहे. आदर्श धार्मिक परंपरा व नवसाची प्रथा श्री कानिफनाथ महाराज देवस्थान जागृत व नवसाला पावणारे असे हे मानले जाते. महाराजांच्या दरबारात येवून नवस मानल्यास इच्छापुर्ती होते. अशी श्रद्धा नागरीकांची आहे. नवस मानल्यास कुंभाराकडुन शिदोन्या आणल्या जातात. यास शहानका असे संबोधले जाते. तसेच ज्यांच्या अंगात
देव येतात. त्यांना शहानका मंदिरात नेतात त्यात पुरणपोळी, दही, हरभरा असे अनेक प्रकारचे मानलेले पदार्थ आणुन नवस फेडले जातात. यात्रेच्या दिवशी लहान मुलांचे जावळ काढण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतो. यावेळी लहान मुलांची लाडुतुला, गुळ साखर तुला, गुळ पोळीचा तुला करून लहान मुलांचे केस कापले जातात.

व तुला केलेल्या पदार्थाचा प्रसाद भाविकांना दिला जातो. यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे

आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता पुजा, ८ ते १० जाऊळाचा कार्यक्रम, ११ ते , १२ वा. महाराजांची महापुजा नंतर शहानका व मंदिरात आणणे देव काठि मिरवणुक व रात्री लोकनाट्य तमाशा असा कार्यक्रम ठेवला जातो. यावर्षी लोकनाट्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here