जळगाव : सर सैयद अहमद खान लायब्ररी, जळगाव यांच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त यावर्षीही परंपरेनुसार एक भव्य, अर्थपूर्ण व सन्माननीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास जळगाव शहरातील मान्यवर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, युवक तसेच मोठ्या संख्येने बालकांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मुजाहिद शेख यांनी अत्यंत शिस्तबद्ध, सुबक व प्रभावी शैलीत केले. त्यांच्या शुद्ध भाषेतील सादरीकरणामुळे संपूर्ण कार्यक्रम प्रभावी ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुरआन पठणाने झाली. श्री. नोमान आसिफ मलिक यांनी सादर केलेल्या कुरआन पठणामुळे वातावरणात आध्यात्मिकता व शांततेची भावना निर्माण झाली.
यानंतर श्री. अबुबकर इद्रीस शेख यांनी राष्ट्रीय गीत सादर करून उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली. पुढे खन्सा इद्रीस शेख यांनी देशप्रेमावर आधारित जोशपूर्ण देशभक्तीपर कविता सादर केली, ज्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
पाहुण्यांचे स्वागत व आभारप्रदर्शन करताना श्री. अब्दुर्रऊफ शेख यांनी सर्व मान्यवरांचे लायब्ररीच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले.
सामाजिक सेवक वसीम खान साहेब यांनी विद्यार्थ्यांना देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता व चांगले नागरिक बनण्याचे महत्त्व पटवून दिले.
सलीम इमानदार साहेब यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करत देशाच्या विकासामध्ये मुस्लिम समाजाची भूमिका, घटनात्मक जबाबदाऱ्या व सकारात्मक योगदान यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कय्यूम असर साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात 26 जानेवारीचे ऐतिहासिक महत्त्व, भारतीय संविधान तसेच नागरिकांचे हक्क व कर्तव्ये यावर सखोल व मुद्देसूद मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर सैयद अहमद खान लायब्ररीचे सचिव अब्दुर्रऊफ शेख गनी साहेब यांनी मुलांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान व प्रजासत्ताक दिनाची खरी भावना समजावून सांगत शिक्षण व ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले.
समारोपापूर्वी लायब्ररीच्या वतीने उपस्थित सर्व मुलांना चॉकलेट व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
शेवटी मुबश्शिर शेख व इद्रीस शेख यांनी सर्व मान्यवर, उपस्थित नागरिक व आयोजकांचे आभार मानून प्रार्थनेसह कार्यक्रमाची सांगता केली.
हा कार्यक्रम केवळ प्रजासत्ताक दिनाचा उत्सव न राहता, मुलांमध्ये व युवकांमध्ये देशभक्ती, घटनात्मक जाणीव व राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणारा ठरला.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर :
कय्यूम असर साहेब (अध्यक्ष), सलीम इमानदार साहेब, युसूफ खान बटाटा, वसीम खान साहेब (सामाजिक सेवक), रझाक खान (जिल्हाध्यक्ष), शम्सुद्दीन शेख, अनीस शाह, नाझिम शाह, सलीम साहेब, आसिफ मलिक, अब्दुर्रऊफ शेख (सचिव), इद्रीस शेख, मुजाहिद शेख, मुबश्शिर शेख, झुबेर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.






