प्रतिनिधी बुलडाणा | viral news live
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित
श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात किन्होळा आज शनिवारला पालक मेळावा घेण्यात आला, विद्यार्थ्यांचे सुप्त गुण , कौशल्य विकासावर भर , शाळेतील भौतिक सुविधा बाबत माहिती , सर्वांगीण विकास , तंत्रज्ञान विषयक माहिती , क्रीडा विषयी माहिती , प्रयोगशाळा , शारीरिक शिक्षण, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाविषयी माहिती देण्यात आली .व एकाही पालकाने कोणत्याही प्रकारची समस्या किंवा सूचना किंवा तक्रार केलेली नाही,
विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी आपले मत मांडत माझ्यासाठी ही गौरवास्पद बाब आहे, मी स्वतः त्यांना आवाहन केले की प्रत्येकाने एक सूचना किंवा तक्रार कंपल्सरी करावी,
तरीही कोणीही कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही, व सूचनाही केली नाही, ही माझ्यासाठी अत्यंत गौरवशाली बाब आहे .
त्यानंतर महिला शिक्षकांनी महिला पालकांसोबत हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला, त्यानंतर महिला पालकांनी महिला शिक्षकांसोबत संगीत खुर्ची खेळली माझ्या सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांचे मी कौतुक करतो असे उद्ग गार मुख्याध्यापक यांनी केले कार्यक्रमाचे संचलन प्रशांत हिंगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सेवा जेष्ठ शिक्षक ए टी परिहार यांनी केले





