उदयनगर : येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये शनिवार, दि. १३ डिसेंबर रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास अमडापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निखील निर्मळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. एन. ए. बोडखे होते. यावेळी मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व पालकवर्ग यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक पी. ए. खराटे यांनी केले. यावेळी त्यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांची उपस्थिती, अभ्यास, निकाल, शालेय उपक्रम व विविध स्पर्धांबाबत सविस्तर माहिती दिली.
पालक व शिक्षक यांच्यातील चर्चासत्र हे या मेळाव्याचे विशेष आकर्षण ठरले. प्रमुख पाहुणे ठाणेदार निर्मळ यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करत पालक व शिक्षकांनी संयुक्तपणे जबाबदारी घ्यावी, असे आवाहन केले.
याप्रसंगी सौ. शालिनीताई अंभोरे, श्री. रघुनाथभाऊ गवई, श्री. पंढरीभाऊ गोराडे, श्री. दीपकभाऊ अंभोरे, श्री. प्रमोदभाऊ आठवले, श्री. प्रदीपभाऊ लाहुडकार, सौ. काळेताई व सौ. चवरेताई यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक मा. एन. ए. बोडखे यांनी पालक-शिक्षक संवादाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे नमूद केले.
या पालक मेळाव्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. सुदेशभाऊ लोढे व सर्व मान्यवर संचालक मंडळाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापक पी. व्ही. नरवाडे, पर्यवेक्षक पी. ए. खराटे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन ए. ओ. तायडे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.





