ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील यांचा सन्मान
(अतीक खान जळगांव)
अहिल्या नगर – भारतीय लहुजी सेना यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय “पत्रकार भूषण” हा मानाचा पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील (रा. पारगाव सुद्रिक, श्रीगोंदा) यांना जाहीर करण्यात आला आहे. वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जन्मोत्सवानिमित्त 30 नोव्हेंबर 2025 रोजी सायं. 7 वा. श्रीरामपूर येथे या पुरस्काराचा भव्य सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. याबाबतचे निवडपत्र भारतीय लहुजी सेना राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांनी बगाडे पाटील यांना प्रदान केले.
राष्ट्रीय सचिव हनीफभाई पठाण यांनी सांगितले की, “नंदकुमार बगाडे पाटील यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून बहुजन समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून शासनदरबारी त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून दिला. विविध शासकीय योजनांचे फायदे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.”
बगाडे पाटील यांनी अनेक दैनिक, साप्ताहिक, मासिक, पोर्टल, चॅनेल आणि टीव्ही माध्यमांमधून उल्लेखनीय कामगिरी बजावली असून गेली अनेक वर्षे ते सामान्य जनतेचे प्रश्न प्रभावीपणे पुढे आणत आहेत.
सन्मानाबद्दल प्रतिक्रिया देताना नंदकुमार बगाडे पाटील म्हणाले, “हा सन्मान माझा नसून मी केलेल्या जनसेवेचा सन्मान आहे. श्रीरामपूर-रामनगर परिसर आणि श्रीगोंदा तालुक्यातील सामान्य जनतेच्या आशीर्वादामुळे मला हा बहुमान मिळाला.”
या प्रसंगी अनेक मान्यवरांनी बगाडे पाटील यांचे अभिनंदन केले. त्यामध्ये
आमदार विक्रमसिंह पाचपुते (श्रीगोंदा), आमदार हेमंत ओगले (श्रीरामपूर), माजी आमदार राहुल जगताप पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नागवडे, ज्येष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब भोस, नगराध्यक्ष मनोहर पोटे, सरपंच सुरेखा दत्तात्रय हिरवे (पारगाव सुद्रिक), तसेच ग्रामपंचायत, सोसायटीचे पदाधिकारी व सदस्य यांचा समावेश आहे.
या निवडीची माहिती दिलीप कुसाळकर यांनी दिली.





