Monday, January 19, 2026
Home Malkapur युवकांनी मनापासून परमार्थ केल्यास निश्चितच देवाची प्राप्ती होईल – ह.भ.प अनंता महाराज...

युवकांनी मनापासून परमार्थ केल्यास निश्चितच देवाची प्राप्ती होईल – ह.भ.प अनंता महाराज लांजुळकर

Advertisement

मलकापुर:- आदर्श नगर,गाडेगांव,श्री संत गजानन महाराज मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही सलग अकराव्या वर्षी श्रीमद् भागवत कथा तथा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन जय गजानन मित्र मंडळाच्या वतीने दि.30 नोव्हेंबर ते 07 डिसेंबर 25 केले होते. या भागवत कथेची समाप्ती रविवार दि.07 डिसेंबर काल्याच्या किर्तनाने झाली.


युवकांनी मनापासून परमार्थ केल्यास निश्चितच देवाची प्राप्ती होईल असे प्रतिपादन काल्याच्या किर्तन प्रसंगी ह.भ.प अनंता महाराज लांजुळकर यांनी केले.

Advertisement


श्रीमद् भागवत कथा तथा अखंड हरिनाम सप्ताहात भागवत कथा प्रवक्ते भागवताचार्य ह.भ.प अनंत महाराज लांजुळकर यांच्या अमृततुल्य वाणीतून कथन केले, सकाळी 6 ते 7 काकड आरती,7 ते 8 विष्णुसहस्त्रनाम, दुपारी 12ते 4 भागवत कथा, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, रात्री 8 ते 10 हरिकिर्तन त्यात दि. 30 नोव्हें रविवार रोजी ह.भ.प पंढरीनाथ महाराज कोऱ्हाळा बाजार,दि.01 डिसें सोमवार रोजी ह.भ.प जिवन महाराज नाडगांव,दि. 2 डिसें मंगळवार रोजी ह.भ.प विजय महाराज मोताळा,दि.3 डिसें बुधवार रोजी ह.भ.प किसन महाराज झांबरे मलकापुर,दि.4 डिसें गुरुवार रोजी ह. भ. प राहुल महाराज कुंडलेश्वर संस्थान बेळी,दि 5 डिसें शुक्रवार रोजी ह.भ.प जगन्नाथ महाराज जामनेर,दि. 6 डिसें शनिवार ह.भ. प चंद्रकांत महाराज साक्री,दि 7 डिसें रविवार रोजी दुपारी 12 ते 03 वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी 05 ते 08 वाजेपर्यंत आदर्श नगर प्रदक्षिणा भव्य दिंडी सोहळा संपन्न करीत रविवार दि.07 डिसेंबर रोजी रात्री 08 ते 10 ह.भ.प अनंत महाराज लांजुळकर यांचे काल्याचे कीर्तनाने भागवत कथेची सांगता करण्यात आली या सांगता सोहळ्यात श्री जगदंबा बाल टाळकरी मंडळी डिघी,गायनाचार्य ह.भ.प डॉ. अमित खर्चे, बबलू खर्चे,मृदुंगाचार्य ह.भ.प सुनिल महाराज बावस्कर सह शेलगांव बाजार, गाडेगांव,वाकोडी,मोरखेड,दाताळा,तालखेड पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता.

Subscribe to Viral News Live