मुक्ताईनगर येथे नाथजोगी समाजातर्फे हिंगणा वैजनाथ येथील घटनेचा निषेध.

Advertisement

मुक्ताईनगर येथे नाथजोगी समाजातर्फे हिंगणा वैजनाथ येथील घटनेचा निषेध. …. समाज बांधवांनी दिले आमदारांसह प्रशासनाला निवेदन.

मुक्ताईनगर प्रतिनिधी… बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील हिंगणा वैजनाथ येथील श्री नवनाथ महाराज मंदिरातील महाराजांच्या मूर्तींची विटंबना केल्याप्रकरणी मुक्ताईनगर येथे नाथजोगी समाजातर्फे घटनेचा निषेध करीत विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील ,भुसावळ प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील , तहसीलदार गिरीश वखारे यांना निवेदन देण्यात आले. तसेच त्या समाजकंटकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदन देते वेळी मुक्ताईनगर नाथजोगी नवतरुण मंडळाचे अध्यक्ष मोतीलाल जोगी, अखिल भारतीय नाथजोगी समाज संघटना जळगाव जिल्हा संघटक संदीप जोगी, ज्येष्ठ रमेशनाथ जोगी, किशोर जोगी, सुरेश जोगी, नामदेव जोगी ,सचिन जोगी ,दत्ता जोगी ,अनिल जोगी, रितेश जोगी, आकाश जोगी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here