मुक्ताईनगर(अतीक खान) मुक्ताईनगर येथील दि.10 डिसेंबर रोजी प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानव अधिकार एवं महिला अपराध नियत्रंण शाखेच्या वतीने “मानव अधिकार दिवस” साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत असे की,10 डिसेंबर हे जागतिक मानव अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येते म्हणून संघटने तर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री दिलीप जी मोहिते सर यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष मोहन मेढे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला या वेळी संघटनेचे कार्याध्यक्ष श्री.बी.डी गवई साहेब आपल्या भाषणात भारतीय संविधान ने जो मूलभूत अधिकार दिले आहेत प्रत्येक नागरिकांना तो श्रीमंत असो की गरीब त्याला एकच मतदान देण्याचे अधिकार दिला प्रत्येक भारतीय नागरिकांना धर्म स्वतंत्र सन्मान याचा अधिकार दिले आहेत.शिक्षणाचा अधिकार ते फक्त संविधानामुळे शक्य आहे म्हणून आज 10 डिसेंबर मानव अधिकार दिवस आपण साजरा करत आहेत.तसेच माजी विस्तार अधिकारी राजकुमार जैन यांनीही आपले मनोगत मध्ये सांगितले की बाल अत्याचार, महिलावर होणारे अत्याचार, वृध्दावर होणारे अत्याचार याबाबत सविस्तर सांगितले व आपण हे अत्याचार कायद्याचे चौकट राहून त्यांना आपल्या संघटनेच्या वतीने न्याय देण्याचे काम करू व आज दिनांक 10 डिसेंबर मानवाधिकार दिनी प्रत्येक गोरगरीब महिलांना व लहान बालकांना न्याय मिळून देण्याकरिता समाजात प्रबोधन करण्याची आवश्यकता आहेत व ते आपण संघटनेच्या माध्यमातून करू असे आज 10 डिसेंबर रोजी आपण संकलप करूया..
सदरच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री मोहनजी मेढे यांनी आपल्या मनोगत मध्ये संघटनेचे मागील दोन वर्षाचे जे काम झाले त्याबाबत सविस्तर माहिती दिली व नवीन सदस्यांना संघटनेच्या वतीने ओळखपत्र वाटप करण्यात आले त्यात प्रा.छाया ठिंगळे मॅडम,श्री राजकुमार जैन व इंद्रायाणी भोई आदींना संघटनेचे ओळखपत्र देण्यात आले.सदरच्या कार्यक्रमा मध्ये तालुका अध्यक्ष श्री भास्कर मिस्त्री,तालुका उपाध्यक्ष श्री जगन्नाथ चांगदेवकर,तालुका कार्याध्यक्ष श्री बि.डी गवई, तालुका संघटक समाधान पाटील सर, संघटक रामदास सुतार,शहर संघटक श्री धनंजय सापधरे,श्री जगदेव इंगळे,तालुका महिला संघटक सौ भारती लोखंडे,तालुका सदस्य श्री चंद्रकांत रावये,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सचिव हकीम चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री विजय खराटे सर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ.कांचन गवई यांनी पर्यंत केले.
मुक्ताईनगर येथील प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानव अधिकार एवं महिला अपराध नियत्रंण शाखेचे तर्फे “मानव अधिकार दिवस” उत्साहात साजरा…
Advertisement
Subscribe to Viral News Live





