मुक्ताईनगर न्यायालयात कायदेविषयक शिबिर संपन्न..

img 20251128 wa0013
img 20251128 wa0013
Advertisement

संदीप जोगी ….मुक्ताईनगर…..
राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या निर्देशानुसार
तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने मुक्ताईनगर न्यायालयात दिनांक २५ रोजी कायदेविषयक जनजागृतीपर शिबिर पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्ताईनगर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश बी.जी. पवार हे होते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲड. संतोष टी. कोळी व ॲड. देवेंद्र बोदडे होते. यावेळी सहाय्यक सरकारी अभियंता ॲड.श्रीकृष्ण दुट्टे, वकील संघाचे सदस्य ॲड.पी.एल.पाटील, तुषार पटेल, एस. एम. तायडे, देविदास काळे, विनोद इंगळे, उल्हास पाटील, उमेश जवरे, नीरज पाटील, रुपेश वानखेडे, धिरज पानपाटील, शैलेश वानखेडे, अखलाख शहा, पंकज हेरोळे, जगदीश निकम, सुजात इंगळे, न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी तसेच पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी न्यायाधीश बी.जी.पवार यांनी अध्यक्षीय भाषण केले आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी येत्या १३ डिसेंबर रोजी असणाऱ्या लोक अदालती मध्ये जास्तीत जास्त प्रकरणे मध्यस्थीने व समोपचराने सोडवण्यासाठी आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲड. संतोष टी. कोळी यांनी पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे पालणपोषण व कल्याण कायदा-२००७ या विषयावर कायदेविषयक सखोल मार्गदर्शन केले आपल्या भाषणात त्यांनी “आयुष्याच्या सांजवेळी मनातील उमेद आणि खिशातील पैसा संपत चाललेला असताना गरज असते ती एका आधाराची” पण त्याच वेळी आपली मुले, सुना, नातवंडे उतार वयात पालकांचे पालण-पोषण करण्यास नकार देतात त्यावेळी या कायद्याचा कसा आधार घेता येतो याबाबत सविस्तरपणे उदाहरणे देऊन कायदेशीर मार्गदर्शन केले. तसेच ॲड. देवेंद्र बोदडे यांनी मध्यस्थी प्रक्रिया व त्याचे फायदे या विषयावर सखोल पणे कायदेविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ॲड. अशोक बोदडे यांनी मानले.

Subscribe to Viral News Live