(अतीक खान मुक्ताईनगर)
मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी च्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज मंत्री श्री. गिरीषभाऊ महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे आणि मंत्री श्री. संजयजी सावकारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या प्रसंगी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठीच्या भाजपा अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि जोमाने कामाला लागण्याचे आवाहन करण्यात आले.
यानंतर केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे आणि मंत्री श्री. संजयजी सावकारे यांनी सर्व अधिकृत उमेदवारांसह शहरातील प्रवर्तन चौकात जाऊन संविधान दिन निमित्त शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमास मंत्री श्री. गिरीषभाऊ महाजन, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, मंत्री श्री. संजयजी सावकारे, जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत बावस्कर, श्री. नंदकिशोर महाजन, श्री. अशोक कांडेलकर, डॉ. केतकी पाटील तसेच सर्व भाजपा अधिकृत उमेदवार, जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





