कुऱ्हा ता. मुक्ताईनगर येथून जवळ असलेले शासकीय माध्यमिक आश्रमशाळा जोंधणखेडा येथे ६ डिसेंबर रोजी मालास बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्वत रांगेच्या पायथ्याशी स्थापित असलेली आश्रम शाळा या शाळेत तीनशे व अधिक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी मुक्काम स आहे. अशा ठिकाणी मासा या संस्थे ने विदयार्थ्यांच्या कलेचे मनोबळ वाढविण्यासाठी स्पर्धा घेतल्या.यामध्ये भरपूर विद्यार्थी व विद्यार्थीनी भाग घेतला.हुशार व कलावन्त विदयार्थ्यांना निबंध, वक्तृत्व, चित्रकला इत्यादी स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, ट्रॉफी व प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होतेआणि संस्थेचे अध्यक्ष विनोद इंगळे,
सचिव शुभम तायडे,कोषाध्यक्ष माला विनोद इंगळे,उपसचिव सतीश साळवे,कार्याध्यक्ष रवींद्र तायडे,सभासद शुभम सोनवणे, गौरव हिरोळे, सोनाली तायडे, सोनाली सांगळे, आदित्य इंगळे, ईलास खान सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांना भविष्यात आणखी उज्ज्वल कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व पालकांची उपस्थिती विशेष ठरली.संस्थेच्या वतीने शाळेने दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले आणि आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी असेच उपयुक्त उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
मालास बहुउद्देशीय विकास संस्थेमार्फत बक्षीस वितरण
Advertisement
Subscribe to Viral News Live




