(अतीक खान जळगांव)
दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी डोंगराळे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक येथे सोनार समाजातील तीन वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी परंडा सराफ सुवर्णकार असोसिएशन तर्फे परंडा येथील तहसीलदार मार्फत महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी सराफ सुवर्णकार समाजातील मोठ्या संख्येने पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष सागर शेठ लंगोटे, उपाध्यक्ष शुभम पेडगावकर, सचिव शिवाजीराव जोशी, तसेच मनोज चिंतामणी, अभिजीत पेडगावकर, विनोद चिंतामणी, नितीन महामुनी, संतोष नसते, मनोज शहाणे, पिंटू दीक्षित, आरूप कुमार, मदन महामुनी, दशरथ गोरे, कदम ज्वेलर्स यांसह अनेक सराफ सुवर्णकार उपस्थित होते.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या क्रूर घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. निवेदनात आरोपीला “फक्त आणि फक्त फाशीची शिक्षा” देण्यात यावी, अशी कडक मागणी करण्यात आली. बालिकेला लवकर न्याय मिळावा व आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, असा आग्रह संघटनेने व्यक्त केला.
परंडा सराफ सुवर्णकार असोसिएशन तर्फे समाजातील चिमुरडी यज्ञा दुसाने हिला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.






