संदीप जोगी __ मुक्ताईनगर…..
मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा गावात ग्रामपंचायतची बखड जागा स्वतःचे नावे करून त्यावर शासनाचे घरकुल योजनेतील घर बांधायचे असल्याने त्यासाठी तक्रारदार हे सरपंच तुळशीराम कांबळे यांना भेटले. सरपंच यांनी 30 ऑक्टोंबर 2024 रोजी ग्रामसेवक यांच्या सहीचा नमुना नंबर आठ उतारा आणून दिला. उतारा काढून देण्याचे मोबदल्यात कांबळे यांनी पाच हजार रुपयाची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी 7 नोव्हेंबर 2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. शेवटी या मोबदल्यात शिपाई आत्माराम मेहनकर यांचे समक्ष तीन हजार रुपयाची मागणी केली होती. याची खात्री झाल्याने लाचलुचपत विभाग च्या पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांचे फिर्यादीवरून सरपंच व शिपाई यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
लाचलुचपत विभागाचे डी वाय एस पी योगेश ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पथकातील सहाय्यक फौजदार दिनेश सिंग पाटील, अमोल सूर्यवंशी यांनी काम केले, तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करीत आहे.




