इच्छुक उमेदवार पक्षाच्या एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत.
संदीप जोगी मुक्ताईनगर….. दोन वर्ष प्रशासक कालावधी असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकी ला सुरुवात झालेली असून जसजशी गुलाबी थंडी वाढत आहे परंतु मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीचे माहोल अजून काही थंडच असल्याचे दिसून येते. राष्ट्रीय सह राजकीय पक्षही अजून अधिकृत उमेदवारांची उमेदवारी जाहीर करीत नसून कोणत्या उमेदवाराला अधिकृत पक्षाचा एबी फॉर्म मिळतो हे 16 नोव्हेंबर च्या कत्तलच्या रात्र नंतरच म्हणजे नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी 17 नोव्हेंबर रोजी दिसून येईल.
माघारीचे दिवसानंतर निवडणुकीच्या प्रचाराला वेद येणार आहे.
मुक्ताईनगर नगरपंचायत च्या पहिल्या नगराध्यक्ष म्हणून भाजपाच्या नजमा इरफान तडवी यांनी पदभार सांभाळला होता. आताही सर्वसाधारण महिला राखीव नगराध्यक्ष पद असल्याने नगराध्यक्षपदी महिला विराजमान होणार आहे.
राज्यात महायुती चे सरकार असून आतापर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या इच्छुक उमेदवारांमध्ये महायुतीचे उमेदवार यांनी अर्ज दाखल केलेले असल्याचे दिसून येते. शेवटी युती होते की नाही हे अजून फिक्स झालेले नाही. महाविकास आघाडी सुद्धा नगराध्यक्ष ,सदस्य पदासाठी उमेदवार व अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याचे चित्र आहे.
सर्व पक्ष आता वेट अँड वॉच च्या भूमिकेमध्ये असल्याचे दिसून येते.
मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असून यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे, विधानसभेचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांचे नेतृत्व पणाला लागणार असल्याचे चित्र आहे .
18 ऑगस्ट 2023 पासून मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये प्रशासक असून दोन वर्षाच्या कालावधीमध्ये मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये 37 कोटी 52 लाखाची विकास कामे प्रशासक कालावधीमध्ये झालेली आहेत. विधानसभेचे आमदार यांच्या सहकार्याने विकास कामे पूर्णत्वास येत आहेत.
मुक्ताईनगर शहरामध्ये जवळपास 60 ते 70 टक्के अतिक्रमण असून हा मुद्दाही निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना पुढे डोकेदुखी होऊ शकतो. स्वतःकडे अथवा कुटुंबातील सदस्यांकडे नगरपंचायत हद्दीमध्ये अतिक्रमण असल्यास सदस्याच्या सदस्य पदावर गदा येऊ शकते.





