उत्कृष्ट प्रशासकीय कार्याची पावती मुक्ताईनगरचे नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांचा मनियार बिरादरीकडून गौरव

उत्कृष्ट प्रशासकीय कार्याची पावती मुक्ताईनगरचे नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांचा मनियार बिरादरीकडून गौरव
Advertisement

मुक्ताईनगर येथील नायब तहसीलदार श्री. प्रदीप झांबरे यांना त्यांच्या उत्कृष्ट, पारदर्शक व जनहितकारी प्रशासकीय कार्याची दखल घेत मनियार बिरादरीच्या वतीने सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. महसूल प्रशासनातील कार्यक्षमता, नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना हा मानाचा सन्मान देण्यात आला.

सत्कार समारंभात मान्यवरांच्या हस्ते श्री. झांबरे यांना शाल व पुष्पगुच्छ प्रदान करून गौरविण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे आणि प्रशासकीय दृष्टिकोनाचे कौतुक करत पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

Advertisement

या कार्यक्रमास जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी, मनियार मस्जिदचे मुतव्वली कलीम मनियार, खजिनदार अहमद ठेकेदार, अब्दुल रफीक शेख, अल्ताफ सर यांच्यासह बिरादरीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रामाणिक, कर्तव्यदक्ष व जनतेशी संवाद साधणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्याला समाजाकडून दिली जाणारी ही सकारात्मक पावती असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here