इलाका किसी का भी हो धमाका हम ही करेंगे…… उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे.

img 20251127 wa0023
img 20251127 wa0023
Advertisement

संदीप जोगी मुक्ताईनगर… मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला आता जोर आला असून 27 नोव्हेंबर रोजी दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष शिवसेना पदाच्या अधिकृत उमेदवार संजना चंद्रकांत पाटील तसेच शिवसेना नगरसेवक पदाच्या निवडणूक रिंगणात उभे असलेल्या सदस्य करिता प्रचार सभा घेतली. प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांचे सह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीपूर्वी मुक्ताईनगर येथील जुने गावातील नागेश्वर मंदिर ते प्रवर्तन चौकापर्यंत भव्य रथावरून उमेदवारांची रॅली काढण्यात आली होती.
सभेत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत आपल्या लाडक्या भावाला मत, ” इलाका किसी का भी हो धमाका हम ही करेंगे, जलवा किसी का भी हो जुलूस हम ही निकलेंगे ” अशा शेरोशायरीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित मतदार राजांना संबोधित केले. वक्फ बोर्डाला 12 कोटी रुपये दिल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तसेच शहरातील 17 प्रभागामधील शिवसेना उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

Subscribe to Viral News Live