अंतुर्ली परिसरात अवैध पत्ता सट्टा जोरात; वाढत्या चोरीच्या घटनांनी नागरिकांत भीतीचे वातावरण

Advertisement

मुक्ताईनगर प्रतिनिधी : मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसरात अवैध पत्ता सट्ट्याचे जाळे मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याची चर्चेला आता अधिक वेग आला आहे. मध्यप्रदेशच्या सीमेच्या जवळ असल्याने पत्ता खेळण्यासाठी बाहेरून, विशेषतः परप्रांतीय लोकांची वर्दळ वाढल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

नागरिकांच्या मते, या वाढत्या हालचालींमुळे अनोळखी लोकांची ये-जा प्रचंड वाढली असून त्याचा थेट परिणाम गावाच्या सुरक्षिततेवर होत आहे. गेल्या काही दिवसांत अंतुर्ली परिसरात झालेल्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये अधिक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनोळखी व्यक्तींच्या वाढत्या उपस्थितीमुळे रात्रीच्या वेळी गावात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचेही स्थानिकांनी सांगितले.

Advertisement

यासंदर्भात नागरिकांनी पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून अवैध पत्ता सट्टा आणि बाहेरून होणारी संशयास्पद वर्दळ यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत असल्याने, सुरक्षा यंत्रणांनी वास्तव स्थितीची सखोल चौकशी करून आवश्यक ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Subscribe to Viral News Live