*अशोक जैन यांचे ६१ मुस्लिम समाज बांधवां तर्फे अभिष्टचिंतन*
*इस्लामी मराठी पुस्तके सह*
जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड चे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांचा १० फेब्रुवारी रोजी ६१ वा वाढदिवस असल्याने त्यांच्या या एकशष्टी निमित्त जळगाव शहरातील मुस्लिम समाजातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील ६१ महानुभावांनी त्यांचे जैन हिल्स येथे जाऊन *शाल,पुष्पगुच्छ, मराठीतील इस्लामी पुस्तके देऊन अभिष्टचिंतन केले.*
जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष मझहर पठाण, काँग्रेस आईचे महानगराध्यक्ष अमजद पठाण ,एम आय एम चे नगरसेवक प्रतिनिधी अक्रम देशमुख, वहीदत ए इस्लामी चे अध्यक्ष अतिक अहेमद, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बंटी सय्यद ,हुसेनी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष फिरोज शेख, ए यू सिकलगर फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर खान, मुस्लिम महासंघाचे सलीम इनामदार, मुस्लिम ईदगाह ट्रस्टचे ताहेर शेख, मुस्लिम पंच मनियार बिरादरी चे रऊफ शेख, शिकलगर बिरादरीचे मुजाहिद खान, मोहसीन खान, एसटी महामंडळ संघटनेचे अजिज खान, पटेल बिरादरीचे मतीन पटेल, शिरसोली पंच कमिटीचे अब्दुल नबी, शेख सय्यद बिरादरीचे राहील शेख, ह्यूमन राइट चे जावेद खान, बार असोसिएशनचे एडवोकेट आमिर शेख, दिव्यांग संघाचे मुजाहिद खान, खरादी असो चे अख्तर शेख, यासह उमर शेख, जलीस शाह,रिझवान खाटीक,जलील कुरेशी, असीम देशमुख, अख्तर शेख, सय्यद मोहसीन,मुस्तकीम शेख, रफिक वायरमन, चांद खान, सलमान खान, अब्दुल रउफ रहीम,सलीम शेख रमजान, शेख कलीम, अनवरखा उस्मान खान, अजीज का हबीब खा, जावेद खान, अल्ताफ शेख, राजा मिर्झा, अब्दुल नबी, गोलू पठाण, झूलकर नयन,आबीद हारून, सलीम मोहम्मद,हारुण मेहबूब, आरिफ रहिमतुल्ला, आशा ६१ मुस्लिम समाजाच्या बांधवांनी अशोक भाऊ जैन यांचे अभिष्टचिंतन केले.
फोटो
अशोक भाऊ यांना शाल अर्पण करतांना फारूक शेख,पुष्पगुच्छ देतांना मझहर खान,इस्लामी पुस्तके देतांना अतिक अहेमद आदी दिसत आहे.