*अशोक भाऊ जैन वाढदिवसा निमित्त- बायर्न चषक फुटबॉल स्पर्धा*
*सेंट अलाइसेस भुसावळ विजयी तर अंजुमन जामनेर उप विजयी*
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यावतीने जिल्हा क्रीडा परिषद जळगाव, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एफ सी बायर्न महाराष्ट्र कप जिल्हास्तर १४ वर्षातील फुटबॉल क्रीडा स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे मा अशोक भाऊ जैन यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित करण्यात आल्या होत्या.
*उदघाटन*
स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉक्टर प्रदीप तळवलकर, फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख यांच्या हस्ते तर जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
*महाराष्ट्र राज्याच्या खेळाडूंसाठी सुवर्णसंधी*
या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्यातील २० उत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात येईल त्या २० खेळाडू एफ सी बायर्न फुटबॉल क्लब जर्मनी येथे प्रशिक्षण देईल व त्याचा संपूर्ण खर्च हा महाराष्ट्र शासन व एफ सी बायर्न हे करणार आहे.
*पारितोषिक वितरण*
या स्पर्धेतिल विजेते व उपविजेते खेळाडूंना जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन व स्पोर्ट्स हाऊस जळगाव तर्फे सुवर्ण व रजत पदक देऊन गौरविण्यात आले.
भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अडव्होकेट सुचिता हाडा,राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष मजरहर खान, फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख व सहसचिव प्रा डॉ अनिता कोल्हे यांच्या शुभहस्ते पारितोषिके देण्यात आली.
या वेळी बास्केटबॉल चे प्रशिक्षक वाल्मिक पाटील, तसेच स्पर्धेचे पंच मुझफ्फर शेख,नरेंद्र तलेकर, शेखर तडवी,विकार शेख,उदय पवार, आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी एम के पाटील यांनी तर आभार क्रीडा अधिकारी सुजाता गुलाने यांनी केले.
पंच
*जिल्हास्तरीय स्पर्धे चा अंतिम निकाल*
१)लॉर्ड गणेशा जामनेर विजयी विरुद्ध पोलीस बॉईज फुटबॉल क्लब ३-२
२)सेंट अलाइसेस भुसावळ विजयी विरुद्ध डॉक्टर उल्हास पाटील भुसावळ १-०
३) अंजुमन हायस्कूल जामनेर विजयी विरुद्ध लॉर्ड गणेशा स्कूल जामनेर ३-२
४)सेंट अलाइसेस हायस्कूल भुसावळ विजय विरुद्ध काशिनाथ पलोड स्कूल जळगाव ४-०
५) सेंट अलाइसेस भुसावळ विजयी विरुद्ध अंजुमन जामनेर १-०
फोटो
विजयी व उप विजयी संघा सोबत खुर्चीवर बसलेले मान्यवर.