Sunday, March 26, 2023
  • Login
Viral News Live
Advertisement
  • Home
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजनीति
  • विदेश
  • स्पोर्ट्स
  • Latest Govt Jobs
  • Contact us
No Result
View All Result
  • Home
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजनीति
  • विदेश
  • स्पोर्ट्स
  • Latest Govt Jobs
  • Contact us
No Result
View All Result
Viral News Live
No Result
View All Result

मुंबई: मुंबई येथे आज दि.१३ डिसेंबर २०२२ रोजी पार पडलेल्या मंत्री मंडळांच्या बैठकीत कु-हा वढोदा इस्लामपुर सिंचन योजना

Rizwan Falahi by Rizwan Falahi
13/12/2022
in breaking, खानदेश
0
मुंबई: मुंबई येथे आज दि.१३ डिसेंबर २०२२ रोजी पार पडलेल्या मंत्री मंडळांच्या बैठकीत कु-हा वढोदा इस्लामपुर सिंचन योजना

मुंबई: मुंबई येथे आज दि.१३ डिसेंबर २०२२ रोजी पार पडलेल्या मंत्री मंडळांच्या बैठकीत कु-हा वढोदा इस्लामपुर सिंचन योजना, ता. मुक्ताईनगर, जि. जळगांव या योजनेला रु. 2226.53 कोटी किंमतीच्या तृतीय सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली असून यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचा गेल्या वर्ष भरापासून पाठपुरावा सुरू होता. यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत मतदार संघातील प्रलंबित योजनेस भरीव निधीची प्रशासकीय मान्यता दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभार मानून उभयतांचा सत्कार आमदार चंद्रकांत पाटील व जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार संजय कुटे यावेळी ग्रामाविकास मंत्री गिरीश महाजन व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आदींसह इतर उपस्थित होते.
दरम्यान, आज मंत्री मंडळ बैठकीत सुधारित प्रशकीय मान्यता मिळाली असून येत्या ८ दिवसात यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली

कु-हा वढोदा इस्लामपुर सिंचन योजना, ता. मुक्ताईनगर, जि. जळगांव या प्रकल्पांतर्गत जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील जिगांव धरणाच्या खालच्या बाजुस 2 किमी अंतरावर रिगाव गावाजवळ पूर्णा नदीचे 100.928 द.ल.घ.मी. पाणी पावसाळ्यात 3 टप्पात उचलुन या प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या इस्लामपूर धरणामध्ये सोडण्याचे प्रस्तावित असून बंदिस्त पाईपलाईनद्वारे 25898 हे. सिंचन क्षेत्र निर्माण करणे प्रस्तावित आहे. या प्रकल्पाद्वारे जळगांव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व बुलढाणा जिल्हयातील जळगाव जामोद व संग्रामपूर अशा तीन तालुक्यातील अनुक्रमे 8249 हे 10122 है. आणि 7527 हे. क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.

प्रकल्पास तापी पाटबंधारे विकास महामंडळाने संदर्भ क्र.1 अन्यये सन 1997-98 दरसूचीवर आधारीत रुपये 155.95 कोटी इतक्या किंमतीस मूळ प्रशासकीय मान्यता प्रदान केली होती. तदनंतर महामंडळाने संदर्भ क्र.2 अन्वये सन 1999-2000 च्या दरसूचीवर आधारीत रुपये 207.08 कोटी इतक्या किंमतीस नव्याने प्रशासकीय मान्यता प्रदान केली होती. त्यानंतर शासनाने संदर्भ क्र. 3 अन्वये सन 2006-2007 च्या दरसूचीवर आधारीत रुपये 503.64 कोटी इतक्या किमतीस द्वितीय प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. त्यानंतर शासनाने संदर्भ क्र. 4 अन्वये सन 2008-2009 च्या दरसूचीवर आधारीत रुपये 842.40 कोटी इतक्या किंमतीस द्वितीय प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे.
इतर कारणांमुळे झालेली वाढ तसेच अनुषंगिक खर्चामुळे (इटीपी व इतर) प्रकल्प किंमतीत वाढ झाली. त्यामुळे तापी पाटबंधारे विकास महामंडळाने प्रकल्पाचा तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव शासनास मंजूरीस्तव सादर केला आहे. त्यामूळे
प्रकल्पाच्या तृतीय सुधारित प्रशासकीय अहवालास राज्य स्तरीय तांत्रीक सल्लागार समितीने रु. 2226.53 कोटी इतक्या रकमेस शिफारस केली आहे.

प्रकल्प अहवालावर दि. 05/9/2019 रोजी झालेल्या त्रिसदस्सीय सचिव स्तरीय समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली असून समितीने प्रस्ताव मा. मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने मा. मंत्रीमंडळाने जळगांव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील 8249 हे. व बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील 10122 हे. आणि संग्रामपूर तालुक्यातील 7527 हे. क्षेत्रास सिंचनाचा लाभ देण्या अनुषंगाने कु-हा वढोदा इस्लामपुर उपसा सिंचन योजनेचे काम पूर्णत्वास नेण्याच्या उद्देशाने जलसंपदा विभाग सन 2017-18 ची दरसूची व सार्वजनिक बांधकाम विभाग यांची सन 2018-19 ची दरसूची तसेच म. जि. प्रा. यांचे सन 2018-19 च्या दरसूचीवर आधारित रुपये 2226.53 कोटी इतक्या किमंतीच्या तृतीय सुधारित प्रकल्प अहवालाला प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

शासन निर्णय-

कु-हा वढोदा इस्लामपुर उपसा सिंचन योजना, ता. मुक्ताईनगर, जि. जळगांव, या प्रकल्पाच्या जलसंपदा विभाग सन 2017-18 ची दरसूची व सार्वजनिक बांधकाम विभाग यांची सन 2018-19 ची दरसूची तसेच म.जि. यांचे सन 2018-19 च्या दरसूचीवर आधारित रुपये 2226.53 कोटी (रुपये दोन हजार दोनशे सर्व्वीस कोटी •लक्ष फक्त) (प्रत्यक्ष कामासाठी रुपये 2093.40 कोटी रुपये दोन हजार त्र्याण्णव कोटी चाळीस लक्ष) व अनुषं‍ग खर्च रुपये 133.13 कोटी (रुपये एकशे तेहतीस कोटी तेरा लक्ष) इतक्या किंमतीस नमूद अटी च्या अधीन राहून तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे आली असून लवकरच येत्या आठ दिवसात शासन निर्णय काढण्यात येणार आहे.

Previous Post

ٹیپو سے نفرت کرنے والوں کا ڈی این اے ٹیسٹ کیا جائے : مفتی محمد ھارون ندوی*

Next Post

जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ जाहीर* *कर्णधारपदी अमळनेरचा अरशद शेख तर उपकर्णधार पदी जैन स्पोर्ट्स चा कौशल पवार*

Next Post
जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ जाहीर*  *कर्णधारपदी अमळनेरचा अरशद शेख तर उपकर्णधार पदी जैन स्पोर्ट्स चा कौशल पवार*

जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ जाहीर* *कर्णधारपदी अमळनेरचा अरशद शेख तर उपकर्णधार पदी जैन स्पोर्ट्स चा कौशल पवार*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताजा खबरे

मदारिस और उलामा का इस मुल्क पर और पूरी उम्मत पर बड़ा एहसान है : मुफ़्ती हारून नदवी :*

मदारिस और उलामा का इस मुल्क पर और पूरी उम्मत पर बड़ा एहसान है : मुफ़्ती हारून नदवी :*

13/02/2023
مدارس اور علماء کا اِس مُلک اور پوری قوم پر احسان ھے : مفتی محمد ھارون ندوی*

مدارس اور علماء کا اِس مُلک اور پوری قوم پر احسان ھے : مفتی محمد ھارون ندوی*

13/02/2023
औलाद को सिर्फ नोट छापने की मशीन मत बनाओ,इनकी अच्छी तालीम तरबियत की फिकर करो : मुफ़्ती हारून नदवी*

औलाद को सिर्फ नोट छापने की मशीन मत बनाओ,इनकी अच्छी तालीम तरबियत की फिकर करो : मुफ़्ती हारून नदवी*

11/02/2023
*اولاد کو صرف نوٹ چھاپنے کی مشین مت بناؤ،اُنکے ایمان و اسلام کی حفاظت بھی فکر کرو : مفتی محمد ھارون ندوی* جلگاؤں 11/ فروری  مفتاح العلوم

*اولاد کو صرف نوٹ چھاپنے کی مشین مت بناؤ،اُنکے ایمان و اسلام کی حفاظت بھی فکر کرو : مفتی محمد ھارون ندوی* جلگاؤں 11/ فروری مفتاح العلوم

11/02/2023
अशोक जैन यांचे ६१ मुस्लिम समाज बांधवां तर्फे अभिष्टचिंतन*

अशोक जैन यांचे ६१ मुस्लिम समाज बांधवां तर्फे अभिष्टचिंतन*

11/02/2023
अशोक भाऊ जैन वाढदिवसा निमित्त- बायर्न चषक फुटबॉल स्पर्धा*

अशोक भाऊ जैन वाढदिवसा निमित्त- बायर्न चषक फुटबॉल स्पर्धा*

10/02/2023
Load More
All Type Of Designing & Printing, Computer Laptop Sales & Service Mobile Accessory
  • Contact us
  • Home

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजनीति
  • विदेश
  • स्पोर्ट्स
  • Latest Govt Jobs
  • Contact us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In