जळगाव शहरातील एका कॅफेत प्रेमी युगुलांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था असल्याची तसेच याठिकाणी गैरकृत्य होत असल्याची बातमी पोलीसांना मिळाल्यावर जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कुमार चिंथा व पथकाने सदर कॅफेवर छापा मारत कारवाई केली.
या कारवाईचे वृत्त प्रसिद्ध केल्याचा राग म्हणून ज्येष्ठ पत्रकार आनंद शर्मा यांना धमकी देणारे कॉल्स आले. पत्राकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनिय कामगीरी व दिलेल्या बातमीच्या आधारे ते वृत्त प्रसारित करण्यात आले होते. ज्या भ्रमणध्वनी क्रमांकावरून ज्येष्ठ पत्रकाराला धमकी देण्यात आली त्या क्रमांकाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी युवासेनेतर्फे पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी युवासेना राज्य सहसचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, महानगर युवाधिकारी स्वप्निल परदेशी, विशाल वाणी, उपशहर युवती अधिकारी वैष्णवी खैरनार, संकेत कापसे, शंतनू नारखेडे, पियुष गांधी, यश सपकाळे, तेजस दुसाने, सागर हिवराळे, अंकित कासार, गिरीष सपकाळे, अमोल मोरे, दिनेश सुर्वे, हितेश ठाकरे, सागर गुरव इत्यादी युवासैनिक उपस्थित होते.
पोलीस अधिक्षक यांनी कठोर कारवाई करण्याचे तसेच शॉप ॲक्ट परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे सांगीतले. यासह वरील कॅफेचे बांधकाम अनाधिकृत असून सदर अतिक्रमणाविषयी योग्य ती कार्यवाही व्हावी यासाठी युवासेना आयुक्त व महापौरांकडे तक्रार करणार आहे.
आपला –
संकेत कापसे
समन्वयक-युवासेना जळगाव शहर
9588411488