Sunday, March 26, 2023
  • Login
Viral News Live
Advertisement
  • Home
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजनीति
  • विदेश
  • स्पोर्ट्स
  • Latest Govt Jobs
  • Contact us
No Result
View All Result
  • Home
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजनीति
  • विदेश
  • स्पोर्ट्स
  • Latest Govt Jobs
  • Contact us
No Result
View All Result
Viral News Live
No Result
View All Result

शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात बोदवड येथील निवडणुकीतील वाद शांत होत नाही तोच मुक्ताईनगरात या दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्‍यांमध्ये राडा झाला असून यातून एकमेकांच्या विरूध्द क्रॉस कंप्लेंट देऊन परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Rizwan Falahi by Rizwan Falahi
25/12/2021
in Uncategorised
0
शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात बोदवड येथील निवडणुकीतील वाद शांत होत नाही तोच मुक्ताईनगरात या दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्‍यांमध्ये राडा झाला असून यातून एकमेकांच्या विरूध्द क्रॉस कंप्लेंट देऊन परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात बोदवड येथील निवडणुकीतील वाद शांत होत नाही तोच मुक्ताईनगरात या दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्‍यांमध्ये राडा झाला असून यातून एकमेकांच्या विरूध्द क्रॉस कंप्लेंट देऊन परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Shivsena Vs. Ncp In Muktainagar)

बोदवड नगरपंचायतीच्या मतदानाच्या दिवशी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन आणि मुक्ताईनगर तालुका प्रमुख छोटू भोई यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आणि जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्याशी केलेल्या गैरवर्तनामुळे वातावरण तापले आहे. यामुळे रवींद्रभैय्यांसह पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. याप्रसंगी त्यांनी मुक्ताईनगरातील अवैध धंद्यांवर कारवाईची अपेक्षा देखील व्यक्त केली आहे. तर याच्या दुसर्‍याच दिवशी समाधान महाजन आणि छोटू भोई यांनी आपल्या सहकार्‍यांसह जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन या प्रकरणातील सत्य समोर आणण्याची मागणी केली. मुक्ताईनगरातील अवैध धंदे हे खडसे समर्थकांचेच असल्याचा आरोप देखील त्यांनी याप्रसंगी केला. एकंदरीत पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादीत यामुळे संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येत आहे. या संघर्षाचा परिणाम मुक्ताईनगर मतदारसंघात उमटणार असल्याची शक्यता होती. आणि झाले देखील तसेच !

मुक्ताईनगर पोलीस स्थानकात काल रात्री दोन क्रॉस कंप्लेंट दाखल करण्यात आल्या आहेत. यातील पहिली फिर्याद एका महिलेने दिली असून यात शिवराज पाटील आणि अजय जैन (दोन्ही रा. मुक्ताईनगर) यांच्यासह सात-आठ जणांनी त्या महिलेचा विनयभंग करून मुलीस ढकलून देऊन पतीला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. यानुसार मुक्ताईनगर पोलीस स्थानकात शिवराज पाटील, अजय जैन आणि इतर अज्ञात सात-आठ जणांच्या विरूध्द भादंवि कलम ३५४, ३२३, ४५२, ५०४, ५०६, १४१, १४३, ४२७ आदींसह कलम ३७ (१) आणि ( ३) चे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसर्‍या महिलेनेही मुक्ताईनगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली आहे. यानुसार, ईश्‍वर हटकर (रा. खामखेडा, ता. मुक्ताईनगर) आणि सुनील पाटील (रा. मुक्ताईनगर) यांच्यासह सुमारे १४-१५ जणांच्या विरूध्द तक्रार देण्यात आली आहे. यात या सर्व जणांनी या महिलेचा विनयभंग केल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. यासोबत संबंधीत महिला आणि तिच्या पतीला मारहाण करून धमकावण्यात आल्याचेही या फिर्यादीत म्हटले आहे. यानुसार ईश्‍वर हटकर, सुनील पाटील आणि अन्य १४-१५ जणांच्या विरूध्द भादंवि कलम ३५४, १४१, १४३, ५०४, ५०६, ५०७ आणि ( ३) चे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राहूल खताळ, उपनिरिक्षक प्रदीप शेवाळे, पो. ना. अविनाश पाटील हे करत आहेत.

या दोन्ही परस्परविरोधी तक्रारींमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील शिवराज पाटील आणि अजय जैन हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असून ते एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक आहेत. तर ईश्‍वर हटकर आणि सुनील पाटील हे शिवसेनेचे पदाधिकारी असून ते आमदार चंद्रकांत पाटील यांचा कट्टर समर्थक आहेत. यामुळे काल रात्रीच्या राड्यातून पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने-सामने उभे ठाकल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात हा संघर्ष अजून चिघळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

Prime News 25 Dec | Ab High Coart Modi Se Keh rahi Ki Please Election Roko Virus Phail raha hai

Next Post

मुक्ताईनगरला अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक संपन्न

Next Post
मुक्ताईनगरला अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक संपन्न

मुक्ताईनगरला अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताजा खबरे

मदारिस और उलामा का इस मुल्क पर और पूरी उम्मत पर बड़ा एहसान है : मुफ़्ती हारून नदवी :*

मदारिस और उलामा का इस मुल्क पर और पूरी उम्मत पर बड़ा एहसान है : मुफ़्ती हारून नदवी :*

13/02/2023
مدارس اور علماء کا اِس مُلک اور پوری قوم پر احسان ھے : مفتی محمد ھارون ندوی*

مدارس اور علماء کا اِس مُلک اور پوری قوم پر احسان ھے : مفتی محمد ھارون ندوی*

13/02/2023
औलाद को सिर्फ नोट छापने की मशीन मत बनाओ,इनकी अच्छी तालीम तरबियत की फिकर करो : मुफ़्ती हारून नदवी*

औलाद को सिर्फ नोट छापने की मशीन मत बनाओ,इनकी अच्छी तालीम तरबियत की फिकर करो : मुफ़्ती हारून नदवी*

11/02/2023
*اولاد کو صرف نوٹ چھاپنے کی مشین مت بناؤ،اُنکے ایمان و اسلام کی حفاظت بھی فکر کرو : مفتی محمد ھارون ندوی* جلگاؤں 11/ فروری  مفتاح العلوم

*اولاد کو صرف نوٹ چھاپنے کی مشین مت بناؤ،اُنکے ایمان و اسلام کی حفاظت بھی فکر کرو : مفتی محمد ھارون ندوی* جلگاؤں 11/ فروری مفتاح العلوم

11/02/2023
अशोक जैन यांचे ६१ मुस्लिम समाज बांधवां तर्फे अभिष्टचिंतन*

अशोक जैन यांचे ६१ मुस्लिम समाज बांधवां तर्फे अभिष्टचिंतन*

11/02/2023
अशोक भाऊ जैन वाढदिवसा निमित्त- बायर्न चषक फुटबॉल स्पर्धा*

अशोक भाऊ जैन वाढदिवसा निमित्त- बायर्न चषक फुटबॉल स्पर्धा*

10/02/2023
Load More
All Type Of Designing & Printing, Computer Laptop Sales & Service Mobile Accessory
  • Contact us
  • Home

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजनीति
  • विदेश
  • स्पोर्ट्स
  • Latest Govt Jobs
  • Contact us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In