Homenewsमाहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या ( महिला विभाग ) बुलढाणा जिल्हा प्रमुख पदी...

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या ( महिला विभाग ) बुलढाणा जिल्हा प्रमुख पदी सौ. आशाताई रावणकार

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या महिला विभाग बुलढाणा जिल्हा प्रचार प्रमुख पदी सौ.आशाताई दिनेश रावणकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आशाताई कित्येक दिवसांपासून अपंग व दिव्यांग लोकांचे कामे करून देतात. त्यामुळे त्यांना अपंग मित्र असही म्हटल्या जाते. हे त्यांचे सामाजिक कार्य लक्षात घेता. त्याची आज थेट महिला जिल्हा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. या निवडीची घोषणा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष. माननीय सुभाष बसवेकर साहेब यांनी केली. व त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. आशाताई यांचे पद मानद स्वरूपाचे असून. त्यांना भारतीय संविधान कायदे आणि महासंघाच्या आचार संहितेचे काटेकोर पणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. सौ. आशाताई रावणकार यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 चां उपयोग व्यापक जनहितासाठी करावा. तसेच या कायद्याचा प्रसार व प्रचार सर्व सामान्य महिला नागरिकांपर्यंत व समाजामध्ये प्रभावी पने करावा . अशी अपेक्षा मा.श्री बसवेकर साहेब यांनी व्यक्त केली आहे. आशाताई यांच्या महिला जिल्हा प्रमुख या नियुक्ती मुळे. माहिती अधिकाराच्या प्रभावी अंमलबजावणी ला गती मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version